Friday, June 19, 2026
Homeगडचिरोली'इकडून दिले अन् तिकडून घेऊ लागले'.. खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या; फोडणी महागली..

‘इकडून दिले अन् तिकडून घेऊ लागले’.. खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या; फोडणी महागली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सरकारने लाडकी बहीण,लाडका भाऊ यांसारख्या योजना आणून सर्वसामान्यांना दिलासा दिला असला तरी खाद्यतेलाच्या भावात भरमसाट वाढ केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला हे परवडणारे नाही.त्यामुळे ‘इकडून दिले अन् तिकडून घेऊ लागले’ असे दिसून येत आहे.सरकारनेच खाद्यतेल स्वस्त दरात द्यावे; अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कच्चे पामतेल,कच्चे सोयाबीन तेल,कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूळ सीमा शुल्कात वाढ केल्याने बाजारात खाद्यतेलाच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे.सध्या खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने भाज्यांची फोडणी महागली आहे.९८ ते १०० रुपये लिटर मिळणारे पामतेल आता १२५ रुपये,तर ११० रुपये लिटरचे सोयाबीन तेल आता १३० रुपये झाले आहे.
खाद्यतेलाच्या किमतीमध्ये किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढ झालेली आहे.काही दिवसांपूर्वी या किमती नियंत्रणात होत्या.परंतु,श्रावण महिना संपल्यानंतर या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्र उत्सव आणि विजयादशमीची धूम असेल.तसेच ऑक्टोंबरच्या शेवटी दिवाळीची धूम पाहायला मिळणार आहे.परंतु हे मोठे सण येण्याआधीच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट चांगलेच कोलमडणार आहे.
सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन,पाम तेलाच्या किमती आता विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.केंद्रातील सरकारने निर्णय घेतल्यानंतर लगेच तेलाचे दर वाढले आहे.त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होणार आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सणासुदीच्या काळात जिथे लोक तेल स्वस्त होण्याची वाट पाहत होते; तिथे थेट प्रतिकिलोमागे १५ ते २० रुपयांनी तेलाच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाक-घराचे बजेट बिघडले आहे.तेल महाग झाल्याने डाळी,भाज्यांची चवही बिघडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!