Saturday, June 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ५ लाख रुपयांपर्यंत यूपीआय ने करता येणार व्यवहार...

आता ५ लाख रुपयांपर्यंत यूपीआय ने करता येणार व्यवहार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या देशात यूपीआय ट्रान्जेक्शनचे(ऑनलाईन पेमेंट)प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनचे प्रमाण वाढल्यामुळे यूपीआयच्या ट्रान्जेक्शनच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.आजकाल प्रत्येकजण छोठे-मोठे आर्थिक व्यवहार तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर करीत आहेत.एखाद्या मोठ्या दुकानापासून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या दुकानापर्यंत प्रत्येकाकडे आज यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोड लावलेला असतो.मात्र यूपीआयचे व्यवहार करण्यासाठी असलेली डेली लिमीट अनेकांसाठी अडचणीचा विषय ठरत होती.तशी तक्रार अनेकजणांकडून केली जात होती.यावरच आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एक मोठा निर्णय घेतला १६ सप्टेंबरपासून यूपीआयच्या रोजच्या व्यवहारात वाढ करण्यात आली आहे. एनपीसीआयने (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेश ऑफ इंडिया) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार १६ सप्टेंबरपासून अनेक भागांत यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.८ऑगस्ट रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली होती.या बैठकीनंतर आरबीआयने यूपीआयच्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचे संकेत दिले होते.आता हा याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय ॲप,पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे.सर्वांनी आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करावे; अशी सूचनाही यूपीआयने केली आहे.

सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या यूपीआय ट्रान्जेक्शनवर एका दिवसासाठी एक लाख रुपयांची ट्रान्जेक्शन लिमीट आहे.असे असले तरी प्रत्येक बँक स्वतःची अशी व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकतात.अलाहाबाद बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा २५ हजार रुपये आहे. तर एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. कॅपिटल मार्केट,कलेक्शन,विमा,परदेशी व्यवहार यासाठी ही मर्यादा प्रत्येक दिवसासाठी दोन लाख रुपये आहे.
एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार नव्या नियमानुसार आता कर भरण्यासाठी (टॅक्स पेमेंट) यूपीआयच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत ट्रान्जेक्शन करता येणार आहे.रुग्णालयाचे बील,शैक्षणिक संस्थांची फी, आयपीओ,आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स या सारख्या व्यवहारांसाठीही आता ५ लाख रुपयांचे यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.एनपीसीआयने याआधी डिसेंबर २०२१ आणि डिसेंबर २०२३ मध्ये यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत बदल केला होता. सध्या एनपीसीआयने एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय यूपीआय सर्कलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!