Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीमहिलेचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय इसमास ३ महिन्यांचा कारावास.. - अहेरी च्या...

महिलेचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय इसमास ३ महिन्यांचा कारावास.. – अहेरी च्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील एटापल्ली नजिक गावाबाहेर प्रातःविधी(शौचास) करण्यास जाणाऱ्या महिलेस आडवून तिचा विनयभंग करण्याची घटना घडली होती.सदरची घटना २४ ऑक्टोबर २०१७ रोजी घडली होती.घटनेतील संशयित आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.जगन्नाथ शिवकुमार बैरागी वय ३६ वर्षे, रा.पंदेवाही,ता.एटापल्ली असे आरोपीचे नाव आहे.
घटना घडलेल्या दिवशी जगन्नाथ पीडितेच्या मागे जात होता.यानंतर पीडितेला आपला कोणतरी पाठलाग करत असल्याचे समजताच ती मागे फिरली.यानंतर जगन्नाथने तिला रस्त्यावर अडवून तिच्यासोबत अभद्र वर्तवणूक करुन तिचा विनयभंग केला.यानंतर महिलेने संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले यांनी तपास पूर्ण केल्यानंतर अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली.यानतंर त्याच्यावर गुन्हा नोंद करुन त्याचावर मागील सात वर्ष न्यायालयात घटला सुरु होता. आज,शुक्रवारी १३ सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल लागला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.बावणकर यांनी साक्षदारांचा जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी जगन्नाथ बैरागी यास ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!