Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतीसाठी ई-पीक नोंदणी आवश्यकच; अन्यथा करावा लागणार अनेक तोट्यांचा सामना..

शेतीसाठी ई-पीक नोंदणी आवश्यकच; अन्यथा करावा लागणार अनेक तोट्यांचा सामना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या पिकाची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई- पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी आवश्यक आहे.याकरिता १५ सप्टेंबर शेवटची तारीख आहे.हस्तलिखित माहितीवर बरेचदा अपडेटपणा राहत नाही.त्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीचा आधार स्वीकारला आहे.हायटेक जमान्यात शेतकऱ्यांनीसुद्धा आपला सातबारा तांत्रिक घटकांचा अभ्यास घेऊन स्मार्ट मोबाइलच्या आधाराने ई पीक पाहणीअंतर्गत अपडेट राहण्याचे ठरवले आहे.
पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे👇
कर्ज प्रकरण सादर करता येणार नाही.पीक विमा मिळणार नाही.नुकसान झाल्यास भरपाईचे ई-पंचनामे होणार नाहीत. सातबारा निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही.खरेदी-विक्रीसाठी अडचण वाढतील.
अनुदानासाठी अडचण निर्माण होईल.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकता येणार नाही तसेच चालू वर्षाचा सातबारा निघणार नाही.
शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाइलवर ई-पीक पाहणी (डीसीएस) व्ही: ३.०.२ ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंदणी करावी.
शेतकऱ्यांना आपले रजिस्ट्रेशन मोबाइल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आहे, अशी सूचना येत आहे. अशावेळी खातेदारांनी पीक पाहणी करताना सर्वप्रथम नवीन खातेदार निवडा वर जाऊन नवीन सांकेतांक प्राप्त झाल्यानंतर ही पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. काही समस्या आल्यास जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!