Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील छत्तिसावे सत्र संपन्न - छत्तीसाव्या सत्रात ब्रम्हपुरीचे...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील छत्तिसावे सत्र संपन्न – छत्तीसाव्या सत्रात ब्रम्हपुरीचे भिमानंद मेश्राम विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे छत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी भिमानंद एस.मेश्राम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “पावसाचे राजकारण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे तसेच कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
भिमानंद एस.मेश्राम हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी,गायक,नाट्य कलावंत व नाटककार आहेत.डॉ.आंबेडकर फेलोशिप अवार्ड, विदर्भ भुषण पुरस्कार,मानव भुषण पुरस्कार,नाट्यश्री पुरस्कारासह अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांचे ‘झाली रमाई महान’ हे नाटक झाडीपट्टीत गाजलेले आहे.अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
छत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे,जयराम धोंगडे,माधुरी अमृतकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,नरेंद्र गुंडेली,विलास टिकले,राजरत्न पेटकर, सुनील चडगुलवार, मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर, सुभाष धाराशिवकर,संगीता ठलाल,वंदना सोरते,वंदना मडावी,सोनाली रायपुरे,डॉ.मंदा पडवेकर, वामनदादा गेडाम,कृष्णा कुंभारे,सुरेश गेडाम,रोहिणी पराडकर, संगीता रामटेके,भिमानंद मेश्राम,तुळशीराम उंदीरवाडे, उकंडराव राऊत,प्रेमिला अलोने,पुरुषोत्तम दहिकर, रेखा दिक्षित,सुरज गोरंतवार,डॉ.मंदाकिनी चरडे,गणेश रामदास निकम,मिलींद बी.खोब्रागडे,वसंत चापले,अजय राऊत, सुजाता अवचट,केवळराम बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!