Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीकोंढाळा जिल्हा परिषद शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' अभियाना अंतर्गत पटकावला तालुकास्तरीय...

कोंढाळा जिल्हा परिषद शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियाना अंतर्गत पटकावला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक… -शिक्षकदिनी प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह व रोख बक्षिसाचे वितरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या अनोख्या स्पर्धात्मक अभियानाचा मागील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा पहिला टप्पा गेल्या वर्षीच पार पडला. त्यानुसार शिक्षक दिनाचे औचित्य साधून काल,गुरुवार दिनांक-५ सप्टेंबरला स्पर्धात्मक अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शाळांना गडचिरोलीच्या जिल्हा नियोजन भवनात  बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.यामध्ये देसाईगंज तालुक्याच्या यशवंत ग्रामपंचायतीच्या कोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियाना अंतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह व रोख बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
माझी शाळा,सुंदर शाळेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी सहभाग नोंदवून घेतला होता.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून सकारात्मक बदल होत असल्याचे आढळून येत आहे.’मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ उपक्रम राबविण्यामागे शासनाचे अनेक उद्देश आहेत. शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता,पर्यावरण,क्रीडा,आदी घटकांबाबत जागृती करणे.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे हा मुख्य उद्देश आहे.
कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा भरते; जवळपास ३५० विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत.शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देखरेख तथा नियंत्रण ठेवल्या जाते.सुसज्ज अश्या इमारती, खुले पटांगण,ई-लर्निंगची सोय,इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सेमी इंग्रजी,दरवर्षी समर कॅम्पचे आयोजन, इंग्रजी वाचन लेखन,प्रश्नमंजुषा,मुल्यवर्धक परिपाठ, स्टुडंट्स मनी बँक,बालवाचनालय,जन्म तारीख व दाखल खारीज रजिस्टर नंबर पाठांतर,कलारंजन, वुक्षारोपण,सहल,शाळा स्तरीय क्रीडा संमेलने, डॉ.बाबा साहेब आंबेडकर सप्ताह,महात्मा गांधी सप्ताह,मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत विविध उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात.नुकतेच मागील वर्षात शाळेला ‘पी एम श्री’ योजनेअंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.या संपूर्ण उपक्रमांची दखल घेत कोंढाळा जिल्हा परिषद शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान,जिल्हाधिकारी संजय दैने,जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,डायटचे प्राचार्य बलराम चौरे,धनंजय चापले,अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार,शिक्षणाधिकारी बाळासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे उपस्थित होते. प्रसंगी जिल्हातीलआदर्श शिक्षक तसेच केंद्रप्रमुखांना गौरविण्यात आले.’मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अंतर्गत देसाईगंज तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल कोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व तीन लक्ष रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.याप्रसंगी पुरस्कार स्वीकारतांना शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,शिक्षक संतोष टेंभुर्णे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!