Monday, August 31, 2026
Homeगडचिरोली'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या तळागळातील बहिणींना मिळाला लाभ... - गडचिरोली शिवसेना...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या तळागळातील बहिणींना मिळाला लाभ… – गडचिरोली शिवसेना संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांच्या प्रयत्नांचे फलित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सुरुवातीपासूनच गडचिरोली जिल्ह्याच्या  शिवसेना शिंदे गटाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात जाऊन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तळागळातील बहिणींना लाभ मिळावा; यासाठी प्रयत्न केलेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म स्वतः वाटप केले होते.अशातच वर्षाताई यांनी अधिकाऱ्यांना भेटून योजना घराघरात कशी पोहोचली पाहिजे; यासाठी सुद्धा पाठपुरावा केला होता.बऱ्याच अंगणवाडी सेविकांना भेटून मार्गदर्शन केलेत आणि महिलांना जास्तीत-जास्त लाभ देण्याविषयी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यासोबत चर्चा करून सहकार्य करावे; अशी मागणी त्यांनी केली होती.त्यानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ दिनांक-१४ ऑगस्ट पासून ते आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे.रक्षाबंधनापूर्वीच योजनेचा लाभ मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थी महिलांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्कप्रमुख वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) यांचे सुद्धा आभार मानले असल्याने वर्षाताई मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे एकप्रकारे फलितच म्हणावे लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!