Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.माधुरी किलनाके यांची नियुक्ती... - चार दिवसांतच डॉ.अनिल...

गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.माधुरी किलनाके यांची नियुक्ती… – चार दिवसांतच डॉ.अनिल रुडे यांची बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा कार्यभार स्वीकारुन चार दिवस होत नाही; तोवर डॉ.अनिल रुडे यांची  बदली करण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ.माधुरी किलनाके यांची जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती केली आहे.दीड वर्षांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक पदावर असताना डॉ.रुडे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरल्यानंतरही त्यांना पुन्हा त्याच पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली होती.त्यानंतर आरोग्य मंत्रालयातून आज,१६ ऑगस्टला नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
यापूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार १२ ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे मुदतवाढीसाठी दाद मागितली होती.परंतु २९ जुलैला त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने १२ ऑगस्टला त्यांचा कालावधी संपला.त्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ.कांचन वानेरे यांनी डॉ.खंडाते यांना सेवामुक्त करण्याचे आदेश देऊन रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारीडॉ.अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात सोपविला होता.आदेश धडकताच डॉ.रुडे फार वेळ न दवडता पदभार स्वीकारला.मात्र,डॉ.अनिल रुडे हे यापूर्वी पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक असताना त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने त्यांची विभागीय चौकशी प्रलंबित आहे. शिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही रुडे यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.असे असताना आरोग्य उपसंचालकांनी डॉ.रुडे यांच्याकडेच पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार सोपविल्याने सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली.माध्यमांनीही हा विषय लावून धरला होता.अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव व्ही.पी.गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) डॉ.माधुरी किलनाके यांच्या नियुक्तीचे आदेश आज जारी केले.त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ.कांचन वानेरे यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये; पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-“कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये.विशेषतः रोजगारासाठी काही काळ गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ त्याच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळले...

ऑनलाईन ‘यूपिआय’ पेमेंटच्या शुल्क आकारणीवर व्यापारी संघटनांचा आक्रमक पवित्रा.. – ‘या’ दिवशी स्वीकारणार नाहीत युपिआयद्वारे पेमेंट..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही वर्षांत सर्वत्र डिजिटल पेमेंट ही दैनंदिन सवय बनली आहे.दूध विक्रेत्यांपासून ते पेट्रोल पंप,भाजीवाले आणि मोठ्या शोरूमपर्यंत सर्वत्र युनिफाइड पेमेंट...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गर्भवती,तरुणाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.विशेष म्हणजे,मुलीची प्रकृती...

पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड; पाच जणांना रंगेहाथ अटक..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!