Saturday, May 30, 2026
Homeजालनानायब तहसिलदाराचे परस्त्रीशी अनैतिक संबंध; शिक्षिका पत्नीने केली आत्महत्या

नायब तहसिलदाराचे परस्त्रीशी अनैतिक संबंध; शिक्षिका पत्नीने केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

जालना :- शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून शनिवारी २८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी स्वतःला झोकून देत जयश्री गणेश पोलास यांनी कौटुंबिक वादातून उडी घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी जयश्री पोलास यांच्या भावाच्या तक्रारी वरून आरोपी पती नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्यावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आज सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मयत जयश्री पोलास यांचे भाऊ संजय चिंतल यांनी दिलेल्या तक्रारीत, जयश्री यांचे सन २००० साली गणेश व्यंकटेश पोलास याच्यासोबत लग्न झालेले असून त्यांना सुदीप (वय २१ वर्ष) व सुजय (वय १७ वर्ष) अशी २ मुले आहेत. गणेश व्यंकटेश पोलास हे जयश्री हीस चांगली वागणूक देत होते. पण सन २०२० मध्ये गणेश पोलास यांचे परस्त्री सोबत संबंध असल्याचे जयश्री यांना कळाले. जयश्री यांनी गणेश पोलास यांना वारंवार समजावून सांगितले. पण गणेश पोलास याच्यावर काहीच फरक पडत नसल्याने जयश्री यांनी माहेरच्या व सासरच्या लोकांना सांगितले. तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडेना.

उलट तो पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. यामुळे नवरा बायकोत वारंवार खटके उडू लागले. गणेश याने जयश्री हिस मुद्दाम त्रास देण्यास सुरवात केली. अखेर २८ जानेवारी रोजी जयश्री हिने मोती तलाव जालना येथे उडी मारून आत्महत्या करुन जाचातून स्वतःला मुक्त केले.
या घटनेनंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गणेश पोलास यांच्या विरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आज त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरवठा खात्यातील गणेश पोलास याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!