Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांकडून ४० वर्षीय इसमाची हत्या..-भामरागड तालुक्यातील दुसरी हत्या..

नक्षल्यांकडून ४० वर्षीय इसमाची हत्या..-भामरागड तालुक्यातील दुसरी हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-शहीद सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा या दुर्गम गावातील लालू मालू धुर्वा या ४० वर्षीय इसमाची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असल्याची घटना आज,दिनांक-३१ जुलै पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

मंगळवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी लालू धुर्वा यास झोपेतून उठवून बाहेर नेले आणि त्यानंतर त्याची हत्या केली.नक्षल्यांनी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली. लालू हा पोलिसांचा खबऱ्या होता.त्याच्या माहितीवरून एकदा आम्हाला कॅम्प सोडून पळावे लागले.त्यामुळे संधी मिळताच त्याची हत्या केली; असे नक्षल्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.त्यावर पीपल्स लिबरेशन गुर्रीला आर्मी असा उल्लेख आहे.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात.२५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे याची नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली होती.त्यानंतर ही दुसरी हत्या आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!