Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेजाऱ्याच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या दोन व्यक्तींना न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा…

शेजाऱ्याच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या दोन व्यक्तींना न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-दिल्ली उच्च न्यायालयाने  शेजाऱ्याच्या पत्नीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या दोन व्यक्तींना गुरुद्वारा रकाब गंज साहिब येथे महिनाभर सामुदायिक सेवा करण्याचे निर्देश दिले आहेत.याशिवाय या प्रकरणी दाखल केलेला एफआयआरही रद्द करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले की,आरोपींना त्यांच्या चुकांचे प्रायश्चित करावे लागेल.त्यासाठी त्यांनी दोन्ही आरोपींना सशस्त्र सेना युद्ध अपघात कल्याण निधीमध्ये २५-२५ हजार रुपये भरण्याचे आणि त्यांच्या परिसरात २०-२० झाडे लावण्याचे आदेश दिले.याशिवाय त्याला गुरुद्वारा रकाब गंज साहिबमध्ये एक महिना सामुदायिक सेवा करावी लागेल,त्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करावे लागेल,असेही आदेश देण्यात आले होते.

तडजोडीमुळे खटला पुढे चालवायचा नाही,असे तक्रारदाराने सांगितले,त्यानंतर न्यायालयाने एफआयआर रद्द केला.न्यायालयाने म्हटले की,अशा परिस्थितीत कारवाई सुरू ठेवण्याचा कोणताही फायदा होणार नाही,परंतु जर आरोपींनी सूचनांचे पालन केले नाही,तर आदेश मागे घेण्याची मागणी राज्य करू शकते.

२०१४ मध्ये आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला होता; ज्यामध्ये महिलेला दुखापत करणे,तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे किंवा तिच्या विनयशीलतेला ठेच पोहोचवण्याच्या हेतूने केलेले कोणतेही कृत्य यांचा समावेश आहे.मात्र, सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना धडा शिकवण्याच्या उद्देशाने काही विशेष सूचना दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!