उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक गडचिरोलीच्या विश्राम गृहात नुकतीच पार पडली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन येणाऱ्या विधानसभे बाबत चर्चा करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नसले तरी खचून न जाता येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी,आघाडीवर असणार आहे.त्यासाठी सर्वांनी कार्य करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील वंचीतचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे;असे गडचिरोली येथे विदर्भ समन्वय समितीचा संपर्क अभियान दौरा अंतर्गत विश्राम गृहातील बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना विदर्भ समन्वय समितीचे मुख्य संयोजक डॉ.रमेशकुमार गजबे बोलत होते.
बैठक प्रसंगी समन्वयक मुरलिधर मेश्राम,गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे,जिल्हा महासचिव मंगलदास चापले,जिल्हा संघटक भिमराव शेंडे,जिल्हा उपाध्यक्ष जी.के.बारसिंगे,जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा निमगडे,जिल्हा संघटिका तुरे,आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम,जिल्हा संघटक बनसोड,अलोणे,युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, भोजराज रामटेके, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, भारत रायपूरे,किशोर भैसारे, जानी सोमनकर,भोजराज रामटेके,किशोर नंदेश्वर,रामदास अंबादे आदि कार्यकर्त्यासहीत मोठ्या संख्येने जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

