Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : अन् धावत्या बस मध्येच 'टिप टिप बरसा पाणी'..!-चक्क बस मध्ये प्रवाशांनी...

गडचिरोली : अन् धावत्या बस मध्येच ‘टिप टिप बरसा पाणी’..!-चक्क बस मध्ये प्रवाशांनी उघडल्या  छत्र्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम,ग्रामीण भागात धावणाऱ्या भंगार एसट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत  आहेत.कधी धावत्या बसचा पत्राच उडतो तर कधी रस्त्यातच बस बंद पडते तर कधी बेरिंग पट्टाच तुटतो तर कधी खळखळ आवाज करून जणूकाही गाणी लागली की काय? अशी अनेक प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यातील बसेसच्या बाबतीत उघडकीस येऊ लागले आहेत.धावत्या बसचा पत्रा उडाल्याचा प्रकार मागे उघड झाला होता.अशातच आता धावणाऱ्या बसमधून पाऊस पाणी सीटवर गळू लागल्याने बसमध्ये ‘टिप टिप बरसा पाणी’ असे होऊन प्रवाशी चक्क छत्री घेऊन प्रवास करतांना दिनांक- ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पोटेगाव मार्गावर सदर प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.पावसाला सुरुवात झाल्याने बसमधील छतगळती सुरू झाली.यामुळे प्रवाशांना सीटवर बसण्यासाठी कोरडी जागा शिल्लक नव्हती.केवळ प्रवाशांनाच नव्हे तर वाहकालासुद्धा या समस्येचा सामना करावा लागला आहे.गडचिरोली आगारातील एमएच ०६ एस ८८६४ क्रमांकाची बस सायंकाळी गडचिरोली येथून सुटली.ही बस पोटेगावमार्गे घोट येथे निवासी असते.या बसमध्ये ८० टक्के महिला होत्या.ही बस पूर्णतः जीर्ण असल्याने बसच्या छतातून पाणी गळत होते.सदर व्हिडीओ याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांनी स्वतः व्हायरल केला आहे.घोट ते गडचिरोली दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये पावसाचे पाणी सीटवर पडत आहे.बसमध्ये पाणी टपातून गळत असताना अनेक प्रवासी पावसाच्या बचावाकरीता उभे आहेत.यातील काहींनी चक्क छत्र्या उघडल्या आहेत.यामध्ये महिला,पुरूषांसह शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी एसटी महामंडळ प्रशासन विविध योजनांचा जागर करीत असले तरी प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या एसटीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे शहरात वातानुकूलित बसमध्ये अनेकांचा प्रवास होत असतांना अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या माथी भंगार बसेस दुमटल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.आधीच नादुरुस्त बसमुळे प्रवाशी वैतागले असताना पावसाचे पाणी चक्क बसमध्ये टपकत असल्याने एसटी महामंडळ प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!