उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत IGNITE MAHARASHTRA -२०२४ (‘इग्नाइट महाराष्ट्र’) या कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक- १० जुलै २०२४ रोजी सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजकीय कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे,राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन स्वयंरोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निर्माण करणे,एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृद्धीस चालना देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यशाळेचा जिल्ह्यातील उद्योजकांनी अवश्य लाभ घ्यावा; असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.
तरी जिल्ह्यातील सुक्ष्म,लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार,निर्यातक्षम,उद्योजक,औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह,औद्योगिक वसाहती, शेतकरी व सहकारी संस्था आणि प्रक्रिया उत्पादक इत्यादींनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.

