उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- फिर्यादीच्या भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार करणाऱ्या मायलेकाला गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस.कुलकर्णी यांनी मंगळवारी दि.२५ ला जन्मठेप व ६ हजार द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.समीर दिलीप कुमरे वय २१ वर्षे व बारुबाई उर्फ अनिता दिलीप कुमरे वय ४० वर्षे दोन्ही रा. पावीमुरांडा ता.चामोर्शी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी देवराव कानू कुमरे हा वय ५० वर्षे रा.पावीमुरांडा याचा भाऊ दिलीप कानू कुमरे वय ४५ वर्षे हा त्याची पत्नी बारुबाई व मुलगा समीर यांच्यासोबत वास्तव्य करतात. दिनांक-२० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी समीर कुमरे हा बांधकाम मजुरीत्या कामासाठी घोटजवळील मंजेगाव येथे गेला होता.२१ ऑगस्ट रोजी फिर्यादीचा भाऊ दिलीप याची प्रकृती बरी नसल्याने तो उपचारासाठी गडचिरोली येथून उपचार घेऊन घरी परतला.तेव्हा तो दारु पिऊन
होता.घरी आल्यानंतर त्याने आरोपी पत्नी बारुबाई हिच्यासोबत भांडण करून मारहाण केली.त्यामुळे पत्नीने आपल्या मुलाला फोनवरून ही माहिती दिली. समीर हा २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घोटवरून एसटी बसने घरी आला.फिर्यादी बँकेच्या कामानिमित्त तळोधी येथे निघून गेला.बँकेचे काम आटोपून घरी परत आला तेव्हा,फिर्यादीच्या भावाच्या घराशेजारील राहणारे किसन पत्रू उईके,संपत जयराम पेंदाम,जीवन उष्ट्र पेंदोर यांनी फिर्यादीला सांगितले की, तुझा पुतण्या समीर व भावसून बारुबाई यांनी तुझ्या भावाशी भांडण करून लाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार केल्याची माहिती दिली. फिर्यादीने याबाबत चामोर्शी पोस्टे येथे तक्रार दाखल केली.पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी समीर कुमरे यास अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.कलम ३०२ भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरून जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.

