Monday, August 31, 2026
Homeगोंदियाग्रामसेवक,मजुरांची मजुरी देण्यास करतोय टाळाटाळ…-कमिशन मागतोय म्हणून मजुरांनी केला आरोप..

ग्रामसेवक,मजुरांची मजुरी देण्यास करतोय टाळाटाळ…-कमिशन मागतोय म्हणून मजुरांनी केला आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील मुरपार येथील ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून निधी उपलब्ध असून केवळ कमिशनसाठी मजुरांची मजुरी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.गेल्या महिनाभरापासून मजुरांना मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणात आमदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

गोंदिया तालुक्यातील मुरपार येथे आमदार निधीअंतर्गत तीन महिन्यांपूर्वी तीन लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.या कामावर आठ मजुरांनी काम केले होते.कामासाठी  मजुरांना मजुरी देण्यासाठी निधीसुद्धा ग्रामपंचायकडे महिनाभरापूर्वीच प्राप्त झाला आहे.गेल्या महिनाभरापासून मजूर मजुरी मागण्यासाठी ग्रामसेवकाकडे जात आहे.पण आधी कमिशन द्या; नंतर मजुरी देतो; अशी भूमिका ग्रामसेवकाने घेतली असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

माहितीनुसार ७ मे रोजी ग्रामपंचायत मुरपारच्या सामान्य फंडात ८१ हजार रुपये जमा आहे.पण ही रक्कम मजुरांच्या बँक खात्यावर जमा करण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याने मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.मजुरांनी या प्रकरणाची आमदार व पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून ग्रामसेवकार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यशोदा दाऊदसरे,मजूर👇

तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम करण्यात आले.याचे पैसेसुद्धा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा करण्यात आले. मात्र ग्रामसेवकाच्या कमिशनखोरीच्या धोरणामुळे मजुरांना मजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

 आनंद पिंगळे, खंडविकास अधिकारी गोंदिया👇

मुरपार येथील ग्रामसेवकाची तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.चौकशीत दोषी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!