Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा-आलापल्ली मार्गावर जडवाहतूकीस बंदी…-पर्यायी मार्गचा अवलंब करण्याच्या सूचना…

सिरोंचा-आलापल्ली मार्गावर जडवाहतूकीस बंदी…-पर्यायी मार्गचा अवलंब करण्याच्या सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६३-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाचे कामामुळे पावसाळ्यात सदरील मार्गावर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतूकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी निर्गमित केले आहे.

यानुसार सदर महामार्गावर १९ जुन च्या मध्यरात्रीपासून ते ३१ आक्टोबर २०२४ पर्यत जड वाहतुकीस मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता सिरोंचा मंचेरियाल राजुरा बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा; तर आलापल्ली हून मंचेरियाल मार्गे जाणाऱ्या मार्गासाठी आलापल्ली आष्टी-बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा; आदेशाचे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदारावर भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

आपातकालीन सेवा,प्रवासी बसेस,पाणीपुरवठा,पोलीस,अन्न-औषध-पुरवठा,महावितरण, दूरसंचार,रस्ते दुरुस्ती व आरोग्य विभाग संदर्भातील वाहनांना सदर आदेश लागू राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!