Monday, August 10, 2026
Homeधानोरानाल्यात ट्रक पलटी होऊन लागली आग; आगीत चालकाचे दोन्ही पाय भाजले…-गडचिरोली- धानोरा...

नाल्यात ट्रक पलटी होऊन लागली आग; आगीत चालकाचे दोन्ही पाय भाजले…-गडचिरोली- धानोरा मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

धानोरा(गडचिरोली) :- तामिळनाडू येथून लोखंडी साहित्य घेऊन येत असताना गडचिरोली-धानोरा मार्गावर गिरोला गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या नाल्यात ट्रेलर ट्रक पलटी होऊन अचानक ट्रकला आग लागली.सदरची घटना आज,दिनांक- १० जून रोजी सकाळी १० वाजे घडली.घटनेची माहिती नागरिकांना कळतच नागरिकांनी लगेच धानोरा पोलिस ठाण्यास संपर्क साधून अवगत केले.ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये फसलेल्या चालकाला सर्वप्रथम बाहेर काढले त्यात चालकाचे दोन्ही पाय भाजल्याने धानोरा ग्रामीण रुग्णालयतून तात्काळ रुग्णवाहिका बोलाविण्यात आली व चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.लागलेली आग विझवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते.त्यानंतर धानोरा येथील नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन व गडचिरोली येथील अग्निशामक वाहन बोलाविण्यात आले व आग आटोक्यात आणली.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

धानोरा येथील पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे व कर्मचारी यांनी तत्परता दाखवल्यामुळे ट्रकचालकाचे प्राण वाचले.ट्रक चालकाचे दोन्ही पाय भाजले असून त्याला गडचिरोली रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!