Saturday, September 26, 2026
Homeएटापल्लीएटापल्लीत दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले…

एटापल्लीत दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लोहखनिजाच्या प्रकल्पात काम करणारे शेकडो कर्मचारी एटापल्ली येथे भाड्याने राहत असल्याने मागील दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले आहेत तर अनेकांना घर भाड्याने मिळणे कठीण झाले आहे.

एटापल्ली हा नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त तालुका आहे. त्यामुळे तालुक्यात कार्यरत असलेले कर्मचारी याच ठिकाणी राहून नोकरीच्या ठिकाणी ये-जा करतात.या कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन काही नागरिकांनी घरे बांधली व ते भाड्याने देत होते.साधारणपणे तीन ते चार हजार रुपये भाडे आकारले जात होते; मात्र हेडरी येथे लोहखनिजाचे उत्खनन करण्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी काम करणाऱ्या बाहेर राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.या कर्मचाऱ्यांना ठेवण्यासाठी कंपनी घरमालक म्हणेलतेवढे भाडे देण्यास तयार होत आहे. जी खोली पूर्वी तीन ते चार हजार रुपयांना मिळत होती.आता त्याचे भाडे १२ हजार रुपयांच्यावर पोहोचले आहे.त्यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!