Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकविसाव्या सत्रात कु.प्रियंका ठाकरे विजयी…-नवोदित कवयित्री देसाईगंज तालुक्याच्या...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकविसाव्या सत्रात कु.प्रियंका ठाकरे विजयी…-नवोदित कवयित्री देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील रहिवासी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

उपक्रमाचे एकविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३३ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री कु.प्रियंका ठाकरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “बोल कळावे जोडीदारास” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

कु.प्रियंका ठाकरे या गांधीनगर (ता.देसाईगंज(वडसा), जिल्हा-गडचिरोली) येथील रहिवासी असून नवोदित कवयित्री आहेत.५० च्या जवळपास कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांचे दै.देशोन्नती व इतर वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.एखाद्या संस्थेतर्फे पुरस्कृत होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.त्या बी.ए.च्या तृतीय वर्षाला शिकत आहेत . 

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एकविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने मुरलीधर खोटेले,जयराम धोंगडे,वंदना सोरते,भिमानंद मेश्राम, नरेंद्र गुंडेली,संतोष पाटील,मनिषा हिडको,सोनू अलाम,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,तुळशीराम उंदीरवाडे,   प्रभाकर दुर्गे,सुजाता अवचट,पांडूरंग मुंजाळ,डॉ.मंदा पडवेकर,कु.मंदाकिनी चरडे,रेखा दिक्षित,प्रब्रम्हानंद मडावी,मनोहर दुधबावरे,रोशन येमुलवार,नागोराव सोनकुसरे,पुरुषोत्तम दहिकर,संतोष कपाले,विलास जेंगठे,प्रियंका ठाकरे,उपेंद्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,चरणदास वैरागडे,गजानन गेडाम,संजय बन्सल,मधुकर दुफारे,संगीता अनील धोटे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

  – चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!