Tuesday, September 22, 2026
Homeभामरागडसुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार-गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील घटना…

सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार-गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भामरागड(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.यामध्ये एक पुरुष कमांडर तर दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार,पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू याच्यासह अन्य दोन जण या चकमकीत ठार झाले आहेत.या दोन महिला नक्षलवादी असल्याची माहिती मिळतेय.या कारवाईत त्यांच्याकडून एके-४७, कारबाईन, इन्सास राफाईल्स ही अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

भामरागड तालुक्यीतल कत्रांगट्टा गावाजवळ काही नक्षलवादी जंगलात तळ ठोकून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.हे नक्षलवादी काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचीही खबर होती. ही माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यातीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली.त्यानंतर या परिसरात शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.यामध्ये नक्षलवाद्यांच्या एका कमांडरसह दोन महिला नक्षलवादी ठार झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!