Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीआजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकेत-गडचिरोलीसह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ...

आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकेत-गडचिरोलीसह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- भारतीय हवामान केंद्र विज्ञान विभाग नागपूर यांनी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्हासह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) असणार आहे.

हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असल्याने दिवसा शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले आहे.त्यामुळे रस्ते तसेच इतर परिसर सामसूम दिसून येतात.अशातच आता आजपासून पुढील चार दिवस उकाड्यापासून नागरिकांची होणारी लाही काहीशी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यानुसार गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आजपासून गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात वादळ वारा तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात दिनांक – ७ मे ते ११ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन करण्यात आले आहे.अवकाळी पाऊस पडला तर शेतकरी बांधवांची गोची होणार आहे.काही दिवसात धान कापणीला सुरुवात होणार असल्याने तोंडातील घास हिरावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!