Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील अठराव्या सत्रात पांडुरंग श्रीरंगराव मुंजाळ विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील अठराव्या सत्रात पांडुरंग श्रीरंगराव मुंजाळ विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच , गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे अठरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २३ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात हिंगोली जिल्ह्यातील कवी पांडुरंग श्रीरंगराव मुंजाळ यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या ” अजूनही माय माझी” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

पांडुरंग मुंजाळ हे  दगडगाव (ता. वसमत, जिल्हा- हिंगोली) येथील रहिवासी असून २०० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.प्राकृतिक भूगोल व हवामानशास्र , हे त्यांचे पुस्तक प्रकाशित असून २० च्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित आहेत.त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित असून सातत्याने कविता लेखनाचे  कार्य करीत आहे.  

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या अठराव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने सोनू आलाम ,भिमानंद मेश्राम,वंदना सोरते,रेखा दिक्षित,जयराम घोंगडे,नरेंद्र गुंडेली,संगीता रामटेके,प्रशांत गणवीर,  चरणदास वैरागडे,कृष्णा कुंभारे, मिलींद खोब्रागडे, तुळशीराम उंदीरवाडे,रेखा दिक्षित,डॉ.मंदाकिनी चरडे,  राज मुंजाळ,डॉ.मंदा पडवेकर,गणेश रामदास निकम,  संतोष कपाले,वामनदादा गेडाम, ज्योत्स्ना बन्सोड, पुरुषोत्तम लेनगुरे,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

    – चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!