Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील पंधराव्या सत्रात तुळशीराम उंदीरवाडे विजयी…

नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंधराव्या सत्रात तुळशीराम उंदीरवाडे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-  नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंधरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात आंबेटोला येथील   कवी तुळशीराम उंदीरवाडे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  “सैनिकांचे ऋण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

तुळशीराम उंदीरवाडे हे आंबेटोला (जि.गडचिरोली) येथील रहिवासी असून ते राष्ट्रीय खडा तमाशाचे प्रसिद्ध शाहीर आहेत.शंभरावर गितांचे लेखन त्यांनी केलेले आहे .नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.ते शोधग्राम (सर्च) येथे सेवेत असून विविध स्तरावरुन त्यांचा  सत्कार झालेला आहे.ते सातत्याने कविता लेखनाचे  कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या पंधराव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  प्रा.विनय पाटील, पुरुषोत्तम लेनगुरे,  जयराम घोंगडे, संतोष कपाले,  विलास जेंगठे,  गणेश निकम,  प्रेमिला अलोने, रेखा दिक्षित, स्वप्नील बांबोळे, पुरुषोत्तम ठाकरे , चरणदास वैरागडे, नरेंद्र गुंडेली,  गजानन गेडाम, ज्योत्स्ना बन्सोड,  नागोराव सोनकुसरे,  वामनदादा गेडाम, राज मुंजाळ, वंदना मडावी, उपेंद्र रोहनकर, खुशाल म्हशाखेत्री,  तुळशीराम उंदीरवाडे, वंदना सोरते, प्रशांत गणवीर, सुजाता अवचट, संगीता रामटेके, वसंत चापले,  डाॅ. मंदा पडवेकर  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!