उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नकोसे असलेले मूल फेकून देण्याचे पाप काही मातांकडून केले जाते.असे केल्यास न्यायालय जन्मदात्यांना कठोर शिक्षा देते.अलिकडे अनैतिक संबंधातून जन्मास आलेले शिशू फेकून देण्याचे प्रकार घडून येतात. काळजाचा तुकडा फेकल्यास दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाद्वारे सुनावल्या जाते.
प्रेम प्रकरणातून लग्न न होताच बाळ जन्माला आल्यास अशा बाळाला कुठेतरी फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो.जन्माला घातलेले बाळ फेकतांना मातेलाही अश्रू अनावर झालेले असतात.प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास संबंधित व्यक्ती तयार होत नाही. त्यावेळी माता निर्दयी बनते, मात्र हे चुकीचे आहे. संबंधित मातेवर कारवाई होते.बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास त्याचा जन्मदाता बाप तयार नसल्यास याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात करता येते.ज्या व्यक्तीपासून गर्भधारणा झाली ती व्यक्ती मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास किंवा लग्न करण्यास तयार नसेल तर याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी, पोलिस यंत्रणा,महिला समुपदेशन केंद्र संबंधित कुमारी मातेला न्याय मिळवून देत असते.मृत अर्भक फेकल्यास ३ वर्षाची शिक्षा; अर्भक जिवंत सापडले असल्यास सर्वप्रथम त्याला दवाखान्यात दाखल केले
जाते.त्यानंतर त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांमार्फत केले जाते.मृत अर्भक कुठेही फेकून दिल्यास संबंधित मातेला दोन वर्षापर्यंतची शिक्षा न्यायालय ठोठावू शकते.मृत अर्भकाची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.अर्भक फेकून देणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे.
अर्भक फेकलेले आढळून आल्यास याबाबतीत तक्रार तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात करावी. तसेच बाळाला जवळच्या दवाखान्यात भरती करावे. पोलिस यंत्रणा कामा लावून अर्भकाच्या आईवडिलांचा शोध घेतात.राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अर्भक फेकून देण्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात घडतात.वर्षातून एखादी घटना उघडकीस येते.

