Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी….डॉ. नामदेवराव उसेंडी ने दिला कांग्रेसचा राजीनामा….-गडचिरोली काँग्रेसला दुसरा झटका…..

मोठी बातमी….डॉ. नामदेवराव उसेंडी ने दिला कांग्रेसचा राजीनामा….-गडचिरोली काँग्रेसला दुसरा झटका…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/ मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कांग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कांग्रेसला रामराम ठोकला असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कांग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.यापूर्वी कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते व कांग्रेसचे महिला प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते या दापंत्यानी कांग्रेसला रामराम ठोकुन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मुंबई येथील कार्यालयात भाजपामधे प्रदेश करून भाजपाचा दुप्पटा बांधला.कांग्रेसला दुसरा झटका डॉ. उसेंडी यांनी देऊन उद्या वंचितची उमेदवारी अर्ज भरणार की काय? अशी चर्चा असुन वंचितच्या स्थानिक नेत्यासी तश्या प्रकारची चर्चा झाल्याची वंचितचे उपाध्यक्ष जि.के.बारसिंगे यांनी दुजोरा दिला आहे.कांग्रेसच्या महाराष्ट्रातील तिकीट वाटप समितीने माझ्याकडे पैसे नसल्याचे कारण सांगुन बाहेर जिल्ह्यातील नवखा परंतु श्रीमंत व्यक्तीला तिकीट देऊन माझ्यावर अन्याय केल्यामुळे मी या अन्याया विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे; असे कारण पत्रकारांना सांगितले.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांग्रेसमधे मोठी खळबळ उडाली आहे. कांग्रेसमधे असतांना चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कार्यक्रम,बैठका व गावोगावी संपर्क ठेवला परंतु कांग्रेसनी माझी कदर केली नाही.आता मात्र कांग्रेसवाले माझी मनधरणी करीत आहेत.मला विधानसभेची उमेदवारी AB फार्म आजच दिला तर मी विचार करू शकतो; अन्यथा माझा मार्ग मोकळा असेही ते सांगण्यास विसरले नाही.डॉ.नामदेव उसेंडी यांनी आपल्या घरी बोलविलेल्या पत्रकार परिषदेला माजी जि.प.अध्यक्ष तथा कांग्रेसचे नेते बंडोपंत मलेल्लवार,काँग्रेसचे अनु.जातीचे नेते काशिनाथ भडके उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!