Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगडचिरोली पोलिसांचे मोठे यश; जहाल नक्षली समर्थकास केली अटक

गडचिरोली पोलिसांचे मोठे यश; जहाल नक्षली समर्थकास केली अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून पोलिस शिपायाचे अपहरण करून हत्या,जाळपोळ,आदी गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षल समर्थकास (जनमिलिशिया) भामरागड येथे नाकाबंदीदरम्यान अटक करण्यात आली.पेका मादी पुंगाटी (४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस होते.

फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी ‘टीसीओसी’ कालावधी साजरा करतात.या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात. टीसीओसी कालावधी तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने २१ मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सुरू केली होती. क्युआरटी, सीआरपीएफचे जवान व भामरागड पोलीस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो कुख्यात नक्षल समर्थक पेका पुंगाटी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यास अटक केली.

१९ डिसेंबर २०२३ रोजी नक्षलवाद्यांनी हिदुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले ३ ट्रॅक्टर, एक जेसीबी पेटवून मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या गुन्ह्यात तो सामील होता. सन २०१६ मध्ये एका पोलीस शिपायाचे अपहरण करुन खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तो नक्षलवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटींगसाठी बळजबरी गोळा करणे, सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे करीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!