Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबनावट चकमक प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ला जन्मठेपेची शिक्षा

बनावट चकमक प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ला जन्मठेपेची शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

या प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या.या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता.आज हा निकाल देण्यात आला.या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्माना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.२००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचे एसआयटी चौकशीत उघड झाले होते.याप्रकरणी मुंबई पोलीस दलांतील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती.त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता.त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते.मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते.परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते.मात्र राजकारणात त्यांना अपयश आले. आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!