Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीआजी-आजोंबासह नातीची निघृण हत्या…-भामरागड तालुक्यातील धक्कादायक घटना..- घटनेशी नक्षल्यांचा संबंध नाही; गडचिरोली पोलिस...

आजी-आजोंबासह नातीची निघृण हत्या…-भामरागड तालुक्यातील धक्कादायक घटना..- घटनेशी नक्षल्यांचा संबंध नाही; गडचिरोली पोलिस अधीक्षक,नीलोत्पल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल धक्कादायक घटना समोर आली आहे.तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध आजी-आजोंबासह नातीची निघृण हत्या केल्याची घटना काल गुरुवारी दिनांक – ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील या तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली जिल्हा हादरला आहे.

अर्चना रमशे तलांडे वय १० वर्षे,रा.येरकल, ता. एटापल्ली,देवू दसरु कुमोटी वय ६० वर्षे,बिच्चे देवू कुमोटी वय ५५ वर्षे,दोघेही रा.गुंडापुरी, ता.भामरागड अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडापुरी येथे देवू व पत्नी बिच्चे कुमोटी हे वृद्ध दाम्पत्य राहत होते.त्यांची विवाहित मुलगी एटापल्ली तालुक्यातील मरकल येथे वास्तव्याने राहायची.चौथीच्या वर्गात शिकणारी तिची मुलगी अर्चना तलांडे ही शाळेच्या सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती.दरम्यान काल, गुरुवारी घरात आजी-आजोबांसह अर्चनाचा मृतदेह आढळून आला.या तिहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती प्राप्त होताच हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव दडस यांच्या नेतृत्वात बुर्गी (कांदोळी) ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.

जिल्ह्यात नक्षल्यांचा ‘पीएलजीए’ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांद्वारे ठिकठिकाणी बॅनरबाजी करुन हत्यासत्र घडवून आणले जात आहे. मागील १८ दिवसात नक्षल्यांद्वारे चौघांची हत्या करण्यात आली आहे.यातच एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गुंडापुरीतील घटनेने एकच खळबळ उडाली असून विविध अफवांना पेव फुटले आहे.

सदरच्या घटनेशी नक्षल्यांचा संबंध नाही; गडचिरोली पोलिस अधीक्षक,नीलोत्पल 👇

ही घटना नक्षल्यांशी संबंधित नाही.हे हत्याकांड  वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. योग्य तपास करुन आरोपींना जेरबंद करण्यात येईल. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!