Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनियमांचा भंग करून डीजे वाजविल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखापर्यंतचा दंड -डीजे...

नियमांचा भंग करून डीजे वाजविल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखापर्यंतचा दंड -डीजे वाजविण्यास परवानगी आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- अनेक ठिकाणी वरात व लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये नियमांचा भंग करून डीजे वाजविले जातात.मुळात परवानगी नसतानादेखील बहुतांश जण डीजे वाजवितांना दिसून येतात.त्याहून पुढे जात लाऊड स्पीकर्सच्या आवाजाच्या मर्यादेचे सर्व नियम मोडले जातात.नियमानुसार जर ध्वनिप्रदूषणा संदर्भातील नियम तोडले तर आरोपींना पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. लग्नाच्या मोसमाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील राहत्या घरी तसेच शहरी भागांमधील मंगल कार्यालये व अन्य इतर ठिकाणी लग्ने उरकली जातात.अनेक ठिकाणी लाऊड स्पीकर्सचा उपयोग तर होतोच.मात्र,अति उत्साहामध्ये डीजेदेखील वाजविला जातो.विशेषतः वरात तसेच हळदीच्या कार्यक्रमांत डीजे वाजविण्याचे प्रमाण जास्त असते.

यावर वाजविली जाणारी अनेक गाणी बीभत्स तर असतातच,शिवाय परवानगी नसताना नियमांचा भंग करून डीजेचा वापर करण्यात येतो.लाउड स्पीकर किंवा डीजे वाजवितांना वेळेच्या व आवाजाच्या मर्यादेचे पालन होत नाही.पर्यायाने अशी मंडळे,संस्था किंवा व्यक्तींवर कारवाई होऊ शकते.पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये आरोपींना पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाचा दंड होऊ शकतो.

नियमांनुसार लाऊड स्पीकर्सला रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी असते.जर प्रशासनाने वेळेची मर्यादा वाढवून दिली,तरच १० वाजेनंतर लाऊड स्पीकर्सचा उपयोग होऊ शकतो.मात्र,बहुतांश ठिकाणी याकडे दुर्लक्ष होते.विविध समारंभ,उत्सवांमध्ये नियमांना हरताळ फासत डीजे लावण्यात येतात.तसेच वेळ व आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करत लाऊड स्पीकर्सचादेखील उपयोग होतो.मात्र,पोलिसांकडून याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात येते.वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील यासाठी पुढाकार घेत नसल्याने कारवाईबाबत पोलिस ठाण्यातील कर्मचारी फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.याकडे दुर्लक्ष न घालता पोलीस प्रशासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!