Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

उद्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- भर उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यातही पाऊस पडतो आहे.अशातच हल्ली सुरू असलेल्या हिवाळ्यातही अवकाळी पावसाने कहर केला असल्याने पाऊस पडण्याचा नेमका ऋतू कोणता? अशा संभ्रमात सर्वच जण पडले आहेत.मागील काही दिवसांपासून वातावरण निरभ्र असतांनाच पुन्हा हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.विशेषतः जिल्ह्यात हवामान विभागाने आज व उद्या दोन दिवस अलर्ट जाहीर करीत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे.मागील आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या धान कळपा पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर या ढगाळी वातावरणाचा तूर पिकालाही फटका बसला आहे.दरम्यान मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात निरभ्र आकाश उजाळले होते.अशातच हवामान विभागाने उद्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची पुन्हा शक्यता वर्तविली.या शक्यतेनुसार आज,मंगळवारी पहाटेपासूनच ढग दाटून आले.सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या.दरम्यान नागपूर विभागाने परत पुन्हा उद्याला येलो अलर्ट जाहीर करीत जिल्ह्यासह दोन जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी धान कापणी,बांधणी व मळणीच्या लगबगीत असतांना अवकाळी पावसाचा कहर शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरविणारा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!