Monday, September 28, 2026
Homeगडचिरोलीजन माहिती अधिकारी एम.टी.गोन्नाडे यांच्यावर रामटेके यांनी केली कारवाईची मागणी….राज्य माहिती आयुक्त...

जन माहिती अधिकारी एम.टी.गोन्नाडे यांच्यावर रामटेके यांनी केली कारवाईची मागणी….राज्य माहिती आयुक्त आदेशाच्या अवहेलनाचे प्रकरण..अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा; यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके स्वतः पुढाकार घेऊन व्यापक जन हिताच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न व उपोषण करीत असतात. होणाऱ्या भ्रष्टाचारावर आळा घातला जावा; यासाठी सर्वांचे पितळ उघडे पाडण्याचा रामटेके यांचा नेहमीच कल असतो.त्यानुसार देसाईगंज(वडसा) सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या देसाईगंज, कुरखेडा,कोरची व आरमोरी या चारही तालुक्यात पूर्वी व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी; याकरिता दिनांक- २ मे २०२३,दिनांक- ३ ऑगष्ट २०२३ व २५ सप्टेंबर २०२३ रोजी असे तीनदा आमरण उपोषण रामटेके यांनी केला होता.त्यानुसार  तीनही वेळा भूलथापा देऊन आमरण उपोषणावरून त्यांना उठविण्यात आले व कुठल्याही प्रकारची चौकशी वा दोषींवर कारवाई करण्यात आली नाही व  सर्वांकडून डावलण्यात आले.आमरण उपोषणापूर्वीच माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ नुसार मुळ अर्ज दिनांक – ३०/०३/२०२१ पासून देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाकडून माहिती मागण्याचा प्रयत्न करूनही त्यांना माहिती देण्यात आली नाही.त्यानुसार प्रथम अपिलीय अधिकारी व नंतर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९(३) नुसार आयोगाकडे दिनांक – १४/०७/२०२१ रोजी “माहिती दिलेली नाही” असे कारण नमूद करून द्वितीय अपील दाखल करण्यात आले.त्यावर अपील क्रमांक-१५३४/२०२१ नुसार द्वितीय अपील दिनांक- ११/०४/२०२३ रोजी नागपूर खंडपीठ आयोगात सुनावणी घेण्यात आली.सुनावणी नंतर काही महिन्याच्या कालावधी नंतर आदेश रामटेके यांना मिळाला.सदर आदेशानुसार अपिलार्थी रामटेके यांचे आदेश प्राप्त झाल्या पासून विद्यमान जन माहिती अधिकारी तथा देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री.एम.टी.गोन्नाडे यांच्याशी संपर्क व समन्वय साधून; कार्यालयात उपस्थित राहून; विषयांकित माहिती मागण्याचा दररोज प्रयत्न करीत आहेत.मात्र जन माहिती अधिकारी यांच्या कडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नसल्याचे रामटेके यांनी म्हटले आहे.उलट जन माहिती अधिकारी म्हणतात की,”मी कोणत्याही आदेशाला मानीत नाही”माझे कोण काय करणार” अशी भाषा वापरून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

जाणून- बुजून मला त्रास देण्याचा प्रकार विद्यमान जन माहिती अधिकारी तथा देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री.एम.टी.गोन्नाडे हे करीत असून राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना करीत आहेत.त्यामुळे विद्यमान जन माहिती अधिकारी तथा देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे विद्यमान वन परिक्षेत्र अधिकारी श्री.एम.टी.गोन्नाडे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सत्यवान रामटेके यांनी केली आहे.अन्यथा येत्या काही दिवसांत गोन्नाडे यांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा रामटेके यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!