Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीवनपाल ते वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी….-गडचिरोली कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या...

वनपाल ते वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी….-गडचिरोली कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन सादर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- मागील गेली दोन वर्षांपासून सातत्याने वनपाल ते वनक्षेत्रपाल पदाची विभागीय पदोन्नती समिती रखडली आहे.त्यामुळे मागासवर्गीय वनपाल यांचेवर अन्याय होत आहे.विभागीय पदोन्नती समिती रखडलेली असल्याने अनेकांना वनपाल पदावरच सेवानिवृत्त व्हावे लागत आहे.वनपाल पद हे पदोत्रतीचे पद आहे.सदर पदावरील सर्व वनपाल हे वयस्क व सेवानिवृत्तीच्या किंवा जवळपासच्या वयोगटातील कार्यरत असून वनपाल ते वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.मात्र तसे होत नसल्याने मागासवर्गीय कर्मचारी यांचेवर एकप्रकारे अन्याय केला जातो आहे.त्यासाठी वनपाल ते वनक्षेत्रपाल पदाची रखडलेली नागरी सेवा मंडळाची बैठक तात्काळ घेऊन,लवकरात लवकर पदोन्नती देऊन,मागासवर्गीय कर्मचारी यांचेवरील अन्याय दूर करावा; यासाठी आज दिनांक-६ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोली कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या मार्फत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर,यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

गडचिरोली कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मागील दोन वर्षाचा विचार करता सन २०२१ मध्ये ४९ तसेच सन २०२२ मध्ये ४१ वनपाल हे वनपाल याच पदावर सेवानिवृत्त झाले आहेत.सन २०२३ या वर्षात ३०, व पुढील वर्षाच्या २०२४ मध्ये १६ आणि २०२५ मध्ये १० वनपाल सेवानिवृत्त होणार आहेत.त्यामुळे वनपाल पदावरुन वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पार न पडल्यास मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नती पासून वंचीत रहावे लागणार आहे.तसेच दिनांक – १३.१०.२०२३ चे अनुषंगाने वनक्षेत्रपाल गट (ब) संवर्गातून सहाय्यक वनसंरक्षक संवर्गात पदोन्नती व रिक्त होणा-या वनक्षेत्रपाल पदाचे अनुषंगाने वनपाल ते वनक्षेत्रपाल पदाची रखडलेली नागरी सेवा मंडळाची बैठक तात्काळ घेऊन लवकरात लवकर पदोन्नती देऊन मागासवर्गीय कर्मचारी यांचेवरील अन्याय दूर करण्यात यावा; अशी मागणी गडचिरोली कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष,नामदेव बन्सोड,महासचिव सिध्दार्थ गोवर्धन,उपाध्यक्ष विजय कंकलवार, सहसचिव नितेश सोमलकर,अमित दंडेवार,प्रकाशभाऊ नैताम आदी सदस्य उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!