Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीची तरुणी शिक्षणासाठी ब्रिटनला रवाना...

गडचिरोलीची तरुणी शिक्षणासाठी ब्रिटनला रवाना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :- जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रेगुंठा येथील किरण कुर्मा ही एक यशस्वी तरुणी म्हणून समोर आली. रेगुंठा येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर किरणला १२ वीचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागले.त्यानंतर कॉलेजमध्ये शिकण्यासाठी हैदराबाद गाठावे लागले. तिने उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए पूर्ण केले.

फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने टॅक्सी चालवणे सोडले. कारण,तिला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा होता.यादरम्यान मी उद्योजकतेमध्येही नशीब आजमावले.आता,मला जगात माझे स्थान शोधायचे आहे.म्हणून,मी युनायटेड किंगडममधील लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला; असे किरणने म्हटले आहे.किरणच्या म्हणण्यानुसार तिला लीड्स युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला आहे.मात्र,त्यासाठी लाखो रुपयांची गरज होती.त्यामुळे तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरवले. तिने शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी तात्काळ सामाजिक न्याय विभागाला महाराष्ट्र सरकारकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यास सांगितले.

किरणला ४० लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाली.मात्र ती वेळेत मिळणे आवश्यक होते.२० सप्टेंबरला ४० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली.लीड्स विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण परदेशात राहणार नाही; असे किरणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!