Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीकेडमारा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत....

केडमारा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- केडमारा जंगल परिसरात पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान तीन पुरुष मृतदेह सापडल्याचे आदेशात नमूद आहे. सदर घटनेतील मृतपावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने; सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारी चौकशी करावयाची आहे.तरी जाहीररित्या सुचित करण्यात येते की सदर घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी,एटापल्ली येथील यांचे न्यायालयात जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत; असे उपविभागीय दंडाअधिकारी एटापल्ली शुभम गुप्ता यांनी कळविले आहे. 

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे.घटनेचे आपण पाहिल्याप्रमाणे वर्णन,आपला या घटने विषयीचा अनुभव,घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती सादर करावी; असे कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!