- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने “दाल में कूछ काला है भाया”अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या हव्यासापोटी भरधाव वेगाने रेती भरलेले टीप्पर गावातील मुख्य रस्त्यांवरून धावताच कुरुड गावचे माजी उपसरपंच क्षितिज उके यांनी आज,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अडवणूक करून तंबी दिल्याने देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान,नायब तहसिलदार विलास तुपट यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून एमएच ३४ बीझेड ५८७१ क्रमांकाचे रेती भरलेले टीप्पर तहसील कार्यालयात जमा केले.अश्यातच कुरुड गावातून होणारी अवजड वाहनातील रेती वाहतूक बंद करण्यात आल्याने आता कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून धावू लागल्याने मार्गांवरील रस्त्यांची पुरती वाट लागणार आहे.विशेष म्हणजे,रेतीची वाहतूक होणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक केली जात असूनही महसूल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी झोपेचे सोंग घेवून बघ्याची भूमिका बजावत असल्याने पाणी कुठे तरी मुरल्या जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच रेतीची वाहतूक कोणत्या मार्गावरून करण्यात येणार,त्यासाठी मार्ग आहे की नाही,वाहतुकीस मार्ग असल्याशिवाय रेती घाटाचे लिलावच होत नाही.मात्र,कुरुड येथील बोडेगाव रेतीघाटातील अवजड रेती वाहतुकीची वाहने कधी कोंढाळा गावातील रस्त्यांवरून,तर कधी ईटियाडोह विभागाच्या नहराच्या मार्गावरून,तर कधी कुरुड गावातील भर वस्तीतील मुख्य मार्गांवरून धावत असल्याने मनमर्जीचीच कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरावस्था तर झालीच आहे.त्यातच, वाहनातील क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक करण्यात येत असतांनाही ना कुणी लक्ष घालत, ना कुणी कारवाईसाठी पुढे धजावत असल्याने याचे नवल वाटत आहे.एखादा अनुचित प्रकार घडला रे घडला की ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणाऱ्यांची व खिसे गरम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे.त्यामुळे काहींनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून कारवाईसाठी पुढे यावे,अशी बोंब सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे; अन्यथा याविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल,असाही इशारा काही तरुण मंडळींनी दिला आहे.
- Advertisement -

