- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून एक मुलगा व एक मुलगी यांना त्यांच्या दत्तक पालकांकडे सुपूर्द केले.कोलकाता व ठाणे येथील कुटुंबांनी या बालकांचे पालकत्व स्वीकारले.
संबंधित पालकांनी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या(कारा)दत्तक प्रणालीवर बालक दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.प्रतीक्षा यादीतील क्रम आणि विहित प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर संबंधित पालकांना बालके दत्तक देण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बालकांना पालकांकडे सुपूर्द केल्याने त्यांच्या आयुष्यातील नव्या कौटुंबिक प्रवासाला सुरुवात झाली.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौणीकर,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, विशेष दत्तक संस्थेचे अधीक्षक नशीब जांभुळकर आदी उपस्थित होते.
- Advertisement -

