- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत,गडचिरोली आणि पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धानोरा येथे तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद पार पडली. ‘नशामुक्त युवक, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात युवक-युवतींना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थितांनी आजीवन निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली.
न्यू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.हिराजी बनपूरकर, मुक्तिपथचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कुडमाटे,निर्माण गडचिरोलीचे प्रकल्प सहाय्यक विक्रांत कुथे आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्राची बनपूरकर यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगितले. सुदृढ आणि ध्येयवादी तरुण पिढी राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असून,विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे,असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.
माय भारत,गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी दृक्श्राव्य सादरीकरणातून व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांची माहिती दिली. कार्यक्रमात धानोरा तालुक्यातील युवक-युवती सहभागी झाले होते.यावेळी संजय बनपूरकर, पुष्पराज उंदिरवडे,लोमेश हरडे,अनिल बनपूरकर आणि रवींद्र वानखेडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भूषण लोळे यांनी केले,तर प्रा.आकाश बर्लावर यांनी आभार मानले.आयोजनासाठी नितीन बावनकर,उत्सव मडावी,संतोष गोपावर आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
- Advertisement -

