- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आज, सोमवार २८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य)अस्मिता मोरे,तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व राखण्यासाठी माहिती अधिकार अधिनियम, २००५ महत्त्वाचा असल्याचे गावंडे यांनी सांगितले.या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांच्या अर्जांची वेळेत दखल घ्यावी,असेही त्यांनी नमूद केले.
- Advertisement -

