- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.हा आदेश २७ सप्टेंबरच्या मध्यरात्री पासून ११ ऑक्टोंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
आदेशानुसार शस्त्रे,इजा पोहोचवण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू,दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि दगडांसारखी फेकण्याची साधने बाळगण्यास मनाई आहे.कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतील अशी भाषणे,घोषणा किंवा प्रदर्शनांवरही प्रतिबंध आहे. उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणूक काढता येणार नाही.तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही किंवा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Advertisement -

