- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी शासनाने निलंबित केले आहे.त्याचबरोबर,त्यांच्याविरूद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गोंदिया जिल्हा रुग्णालय असणार आहे व डॉ.लहाडे यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.विशेष म्हणजे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी आज बुधवारच्या दुपारीच स्टेटमेंट म्हणजेच आपले मत व्यक्त केले होते.त्यात, ‘वैद्यकीय विज्ञानाने कितीही प्रगती केली असली,तरी प्रत्येक रुग्णाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच होतो असे मानणे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे.वैद्यकशास्त्रात अनेक आजार आणि गुंतागुंती अशा असतात,ज्या मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात; अशा अपरिहार्य(Inevitable) परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचवणे निसर्गतः अशक्य ठरते.गर्भाशयात मैला जाणे (Meconium Aspiration),अचानक हृदयक्रिया बंद पडणे,अंतर्गत रक्तस्त्राव किंवा फुफ्फुसाचे गंभीर आजार यांसारख्या आकस्मिक वैद्यकीय आणीबाणीत डॉक्टर उपलब्ध सर्व साधनसामग्री व ज्ञानाचा वापर करून केवळ जीवन वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतात.डॉक्टर हे जीवनरक्षक म्हणून कर्तव्य पार पाडतात,परंतु ते जीवन-मरणाचे अंतिम नियंता नसतात.त्यामुळे प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी,आजाराचे गांभीर्य आणि परिस्थितीची अपरिहार्यता समाजाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले होते.अश्यातच त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
निलंबन काळात महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक)नियम, १९१७९ च्या नियम १६ मधील तरतुदीनुसार डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही,अथवा स्वतःला व्यापार अथवा उद्योगधंद्यामध्ये गुंतवून घेता येणार नाही.जर निलंबनाधीन असतांना उक्त डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा स्वतःला व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये अडकवून घेतले तर त्यांनी गैरवर्तन केल्याचे समजण्यात येऊन नियमानुसार कारवाईस त्या पात्र राहतील,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

