Thursday, October 8, 2026
Homeमुंबईभंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास...

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५ हजार रुपये द्यावे लागतील,असे म्हणत तडजोडी अंती ३० हजारावर डन करताच मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले.राजेंद्र कृष्णा पवार वय ४६ वर्षे,पो.ह.क्र.३५६२ भोईवाडा पोलीस ठाणे,ठाणे शहर असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील ३३ वर्षीय पुरुष तक्रारदार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून ठाणे शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र पवार यांनी तक्रारदार यांना भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असल्यास तसेच त्यांच्या व्यवसायास कोणताही त्रास होणार नाही,याकरीता ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे १९ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार केली.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने काल,गुरुवार २० ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता,राजेंद्र पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार,काल गुरुवारी तात्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान राजेंद्र पवार यांना तक्रारादार यांच्याकडून ३० हजार रुपये लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानुसार,आज शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी ठाणे शहराच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात राजेंद्र पवार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं.३४५/२०२६,भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.सदची कारवाई-सापळा अधिकारी मनोज गोडसे,पोलीस निरीक्षक,मो.नं.९८२१७३७३७९
पर्यवेक्षक अधिकारी संदीप बडगुजर,सहाय्यक पोलीस आयुक्त,मो.नं.९८२१६६८२६६
सापळा पथक :- १)स.फौ.३१०८७/पोळ, २) पोह ९७०६५४/पाडळे, ३)पोह ०३२११/मठपती,
४) पोह ०३७१२/गावडे,५) पोशि ०९२२६२/दराणे, ६) पोशि १८१२२०/ वाईगडे,७) पोशिचा २१६३२१/चौरे, ८)पोशिचा २३०४६३/पाटील
मार्गदर्शन :-
१) संदिप दिवाण,अप्पर पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.,मुंबई
२) अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस उप आयुक्त(१), ला.प्र.वि.,मुंबई, मो.नं.७७९६५९११००
३)अनंत साळुंखे,अप्पर पोलीस उप आयुक्त(२), ला.प्र.वि.,मुंबई,आदींचे मार्गदर्शन लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!