Saturday, July 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तडॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदची घोषणा.. - २४ तासासाठी आरोग्यसेवा राहणार बंद..

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदची घोषणा.. – २४ तासासाठी आरोग्यसेवा राहणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉ.सृष्टी बाविस्कर आणि डॉ.वैभव साळुंखे यांना झालेल्या कथित मारहाणीनंतर देशभरातील डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.डॉक्टरांवरील हल्ले आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत,अशी भूमिका घेत हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.येत्या,सोमवार २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार,२१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत,असे २४ तास राज्यातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला ॲलोपॅथी,आयुर्वेद,होमिओपॅथी या सर्व वैद्यकीय शाखांचे डॉक्टर,परिचारिका संघटना आणि पॅरामेडिकल स्टाफ पाठिंबा देणार आहेत.या २४ तासांच्या बंद दरम्यान,सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)आणि नियोजित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद राहतील.मात्र,सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा,अतिदक्षता विभाग (आयसीयू),प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार कोणत्याही अडथळ्याविना अविरत सुरू राहतील,असे ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे.हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून,डॉक्टरांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे यासाठीचा लढा असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले; गंभीर जखमी शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  शिक्षकाला वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू...

३५२ कलावंतांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम.. – देसाईगंज,गडचिरोली व अहेरी येथे होणार पडताळणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत...

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!