Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीउद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. - पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश...

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांचेही स्वागत उत्सवाच्या वातावरणात करण्यात येणार असून,शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीद्वारे जनजागृतीने होणार असून त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात,पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्यासाठी पहिल्याच दिवशी त्यांना पाठ्यपुस्तके,स्टेशनरी,पेन,पेन्सिल,शालेय गणवेश, शूज-मोजे आणि स्कूल बॅग यांचे वितरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या विविध संधींची माहिती मिळावी यासाठी प्रवेशोत्सवानिमित्त विमान प्रवासासह अभ्यास सहल,जेईई व नीट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण,तसेच न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.या प्रदर्शनातून विद्यार्थी आणि पालकांना उच्च शिक्षण,स्पर्धा परीक्षा आणि विविध शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रवेशोत्सवाच्या नियोजनासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच प्रकल्पांतर्गत वसतिगृहांचे गृहपाल यांची ‘पालक अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.हे अधिकारी आज २९ जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून प्रवेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेत असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक समन्वय साधत आहेत.
यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षेत प्रत्येक आश्रमशाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तसेच मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रकाशन करून नवीन शैक्षणिक वर्षाचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे.दरम्यान,शासकीय आश्रमशाळा ताडगाव येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, भामरागड अमर राऊत हे पालक अधिकारी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करणे,शाळांमध्ये नियमित उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिबट्याच्या कातडीसह दोघेजण ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-नागपूरच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या((डीआरआय)प्रादेशिक पथकाने  गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव तस्करांच्या मुसक्या आवळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याची कातडी बाळगल्याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतले.धनराज...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी औषधांची...

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!