Monday, June 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाकर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग; पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळणार कर्जमुक्तीचा लाभ.. -...

महाकर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग; पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळणार कर्जमुक्तीचा लाभ.. – पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते.परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे.कधी अवकाळी पाऊस,कधी तीव्र दुष्काळ,तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर…एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे.कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.ते म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून,आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे.
महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात
राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे.अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून,पुढील जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
  • योजनेचे त्रिसूत्र कर्जमुक्ती एकवेळा समजोता आणि प्रोत्साहनपर लाभ👇
या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर,विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे.यामध्ये प्रामुख्याने तीन घटकांचा समावेश आहे:
यात २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती: जे शेतकरी थकबाकीदार आहेत,अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे.यापूर्वीच्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे.
एकवेळ समझोता योजना(OTS): ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS)म्हणजेच एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर,राज्य शासन कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन: अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात.अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये,म्हणून शासनाने त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
डिजिटल तंत्रज्ञान आणि पारदर्शकता
 कर्जमुक्तीयोजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे.
सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून,संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत.या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी,ग्रामपंचायत, बँक शाखा,विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.विशेष म्हणजे,पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन👇
 ‘आधार प्रमाणीकरण’अनिवार्य👇
 
योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे.पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली,की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल आणि एकवेळ समझोता (OTS)योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या हिश्शाची रक्कम भरणे आवश्यक आहे,त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ शेकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.
  • तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा👇
योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे.कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी,म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.तसेच या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समितीसुद्धा नियुक्त करण्यात आली आहे.
प्रशासकीय समन्वय👇
 
सहकार विभाग,जिल्हाधिकारी,बँका,महाआयटी, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन या सर्व घटकांमध्ये राज्य शासनाने अचूक समन्वय साधला आहे.विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा ‘कर्जमुक्त’ होऊन ‘कर्जपात्र’ होणार आहेत.त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू कर्जमुक्तीचा लाभ राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी गती,नवी ऊर्जा आणि बळिराजाला सन्मानाने जगण्याचा नवा विश्वास देणारा ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "माझा गाव...माझी शाळा...माझी जबाबदारी" या संकल्पनेतून देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,सोमवार २९ जून रोजी सकाळच्या सुमारास...

अखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात दोघांचा बळी घेणारी व दोघांना जखमी करणारी टी-२७ नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.आज,रविवार २८...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच...

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!