- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५ ग्रामपंचायत स्तरावरील व २ नगर परिषद/नगर पंचायत स्तरावरील केंद्रांचा समावेश आहे.
केंद्र चालक निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्जाचा नमुना,केंद्रांची यादी व सविस्तर माहिती www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक सुलभ,जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात,या उद्देशाने ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
- Advertisement -

