Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीमहिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावास- चामोर्शी तालुक्यातील आरोपी

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावास- चामोर्शी तालुक्यातील आरोपी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एन. डी.मेश्राम यांनी आज एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.नितीन अर्जुन कन्नाके वय २८ वर्षे रा. चौडमपल्ली ता.चामोर्शी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

नितीन कन्नाके हा गावातील एक महिला शौचास बाहेर जंगलामध्ये गेली असता,तिच्या मागेमागे जाऊन तिचा विनयभंग केला.पीडितेने घडलेली घटना तिच्या घरातील लोकांना सांगितली.घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन आष्टी येथे देण्यात आली.महिला पोलिस निरीक्षक समू चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र चामोर्शी न्यायालयात दाखल केले. सदर मामल्यात साक्षीदारांचे पुरावे नोंदवून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी आरोप नितीन कन्नाके यास कलम ३५४,३५४ (अ) भादंवि अन्वये गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे विशेष साहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड.डी.व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!