Tuesday, June 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढणारी बातमी; गॅस सिलेंडर आणखी झाला महाग..

हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढणारी बातमी; गॅस सिलेंडर आणखी झाला महाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हॉटेल व्यावसायिकांसाठी केवळ चिंता वाढणारीच बातमी नाही,तर त्यांच्या व्यवसायावर तसेच आर्थिक बाबींवर महागाईचा दबाव वाढून कंबरडे मोडण्याचा खेळ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे,महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करून महागाईचा आणखी एक मोठा झटका दिला आहे. यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ४३.५० रुपयांनी वाढून ३ हजार २९१.५० रुपयांवर पोहोचली आहे.यापूर्वी ४ मे २०२६ रोजी गॅस सिलिंडरची किंमत ३ हजार २४८ रुपये होती. हप्त्याहप्त्याने वाढणाऱ्या सिलिंडरच्या दरांचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना बसत आहे.दरवाढीमुळे हॉटेल,रेस्टॉरंट,ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यापूर्वीच अनेक हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांसोबतच चहाच्या दरातही वाढ केली आहे.सिलिंडर,डिझेल आणि पेट्रोलच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे महागाई आणखी भडकत असल्याचे चित्र आहे.त्यातच,खाद्य तेल,डाळी आणि विविध साहित्यांचे दर भडकू लागल्याने युद्ध पाहला इराण आणि अमेरिकेचा अन् फटका बसू लागलाय भारताला.वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरू लागल्याची भावना जनसामान्यांतून उमटू लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हुक काढत असतांनाच अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे आणलेली रेती खाली करण्यासाठी ट्रॉलीचा मागील हुक काढत असतांनाच घडलेल्या अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना...

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार...

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!