Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरएमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

एमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज,रविवार ३१ मे रोजी मोठी कारवाई करत एका तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ किलो ५०० ग्रॅम एमडी(मोफेड्रोन)ड्रग्स जप्त केला आहे.मजहर अली अकबर अली शेख वय ३२ वर्षे,रा.टेकानाका,नवी वस्ती,पाचपावली,नागपूर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो म्हाडा कॉलनी परिसरातील एसडीपीएलच्या निवासी संकुलात किरायाने राहतो.
नागपूरच्या जरीपटका पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला परिसरात मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष मोरखडे यांच्या पथकाने मजहरवर पाळत ठेवली होती. दरम्यान,आज रविवारच्या सकाळी त्याच्या खोलीची झडती घेण्यात आली.त्यावेळी पोलिसांना ७ किलो ५०० ग्रॅम एमडी साठा आढळून आला.जप्त करण्यात आलेल्या एमडीची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.चौकशीदरम्यान आरोपी मजहरने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.त्याने दिल्लीतून विविध ठिकाणी जाऊन ही एमडी नागपूरसह राज्यात पाठविण्यासाठी आणल्याची माहिती आहे.त्यासाठी त्याला परराज्यातील महिलेने सहकार्य केल्याची माहिती आहे.त्यामुळे या प्रकरणामागे राज्याबाहेरील तस्करांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. एवढा मोठा ड्रग्सचा साठा उघडकीस आल्याने तरुणांना नशेच्या खाईत ढकलण्याचे काम तस्करांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!