Saturday, October 10, 2026
Homeगडचिरोलीऔषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत मिळावा आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये,असे आवाहन सातत्याने सुरू ठेवले आहे.तसेच बंदच्या काळात काही औषध दुकाने सुरू राहतील याची दक्षता घेण्याबाबत संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो.9096414104)तसेच सहायक आयुक्त(औषधे)नीरज लोहकरे(मो.7276544972) यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
  • जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क क्रमांक👇
सिरोंचा – 9421729671
भामरागड – 9404438383
एटापल्ली – 9421856516
आलापल्ली – 9421729384
अहेरी – 9767820220
मुलचेरा – 9421854819
आष्टी – 9422151299
चामोर्शी – 9588678242
गडचिरोली – 9421735620 / 9423422130
आरमोरी – 9403820216 / 9420973680
देसाईगंज – 9422150640 / 8999362844
कुरखेडा – 9404831332
कोरची – 9422154766 / 7757005944
धानोरा – 7588772743
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सेवा घ्याव्यात,असे गडचिरोलीचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त(औषधे) नीरज लोहकरे यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!